मार्केट

कृषि उत्पन्न बाजार समिती कामठीची स्थापना 9 मे 2006 महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सन 2003 च्या 11 व्या सुधारणे नुसार कायद्यामध्ये कलम 27(आ) समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती कामठी च्या शासनाच्या आदेशाने नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती त्रिभाजन झाल्यावर सन 2006 मध्ये कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात 77 गावे सामील आहेत सुरवातीला प्रशासकांनी बाजार समितीच्या कार्याची व विकासाची सुरुवात केली.

संचालक मंडळाची सन 2012 मध्ये निवडणूक झाली. सहकारी संचालकांनी पुढाकार घेऊन व संपूर्ण सहकार्य करून या बाजार समितीच्या यार्डवर भाजीच्या दुकानदारासाठी गाळे व शेड तयार केले. संपूर्ण यार्डला संरक्षण भिंत बांधण्यात आली असून आवक - जावक गेटवर सुरक्षा गार्ड 24 तास असतात कार्यालयात सी. सी. टीव्ही कॅमेराद्वारे नियंत्रण ठेवले जाते. कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्याकरिता व यार्डवर शेतकऱ्यांकरिता व अडते, व्यापाऱ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. बाजार समितीच्या यार्डवर 50 मे. टनाचा इलेक्ट्रॉनिक भुईकाटा लावण्यात आला आहे.